। हिंगोली । प्रतिनिधी ।
बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी. त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरयांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने निवडणूक आयोग आता यावर काय कार्यवाही करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हिंगोलीच्या कळमनुरी येथे आमदार संतोष बांगरयांनी एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे.