मुरुड येथे शांतता समितीची सभा

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता मुरुड पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक-प्रकाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक तसेच शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटी सदस्य यांची एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले. अकोला व अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक तेढाच्या घटनांमुळे तालुक्यात व शहरांमध्ये कोणताही जातीय प्रश्‍न निर्माण होणार याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सोशल मीडिया तर्फे पसरवण्यात येणार्‍या आफवांवर विश्‍वास ठेवू नये तसेच कोणी आफवा पसरवत असेल जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करत असेल त्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version