तळा येथे शांतता कमिटीची बैठक

| तळा | वार्ताहर |

आगामी येणार्‍या होळी, धुलीवंदन, रंगपंचमी, रमजान ईद, रामनवमी सणांच्या पार्श्‍वभूमीवर तळा शहरातील चंडिका मंदिरात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांच्या अध्यक्षतेखाली या पार पडलेल्या या बैठकीत त्यांनी नागरिकांना सर्व सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

होळी सणासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावाला परतणार आहेत. अशावेळी काही गावातील तरुण पिढी मद्यप्राशन करून भांडण करण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, गाव अध्यक्ष व ग्रामस्थ यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक मंगेश पोळेकर, नरेश सुर्वे, अविनाश पिसाळ, मंगेश शिगवण, चंडिका देवी ट्रस्ट अध्यक्ष अ‍ॅड. चेतन चव्हाण, विश्‍वस्त महेंद्र कजबजे, चंद्रकांत भोरावकर यांसह सर्व पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version