शांतता कमिटीची बैठक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मुरुड पोलिस ठाण्याच्या वतीने तालुका शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत ईद व अक्षयतृतीया सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक-प्रकाश सकपाळ यांनी यावेळी केले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुमित खोत, सचिन वाणी,परेश म्हात्रे, ऋषिकांत डोंगरीकर, भरत बेलोसे, राशिद फहीम, इम्तियाज मलबारी, फैसल उलडे, जाहिद फकजी, यशवंत पाटील, विलास आंबेतकर, लहु रावजी आदिंसह कमेटी सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version