। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुडमध्ये गौरी गणपती विसर्जनच्या मिरवणुकीत दोन धर्मात तेढ निर्माण झाले होते. यामुळे मुरुड शहरांसह पंचक्रोशी भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रायगड अलिबाग पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी यांनी मुरुड तालुक्यातील नाक्या नाक्यावर व संवेदनशील भागात कडक बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठीत नागरिकांची तातडीने बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला दोन्ही धर्माकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. तरी देखील पोलिस अधिकारी व कर्मचारी या घटनेकडे लक्ष ठेवून होते. यावेळी दोन्ही धर्माला शांत करण्याचे काम पोलिसांनी उत्तम केल्याने मुरुड शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी, पोलिस निरीक्षक उदय झावरे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच, पोलिस उपनिरीक्षक दिपक राऊळ यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा ही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी अशिलकुमार ठाकूर, कुणाल सतविडकर राजेश मुळेकर, राहुल कासार, स्वप्नील कांबळे, माँटी दांडेकर, विशाल कोलवणकर, यश माळी, सचिन करंदेकर प्रतीक उमरोटकर, सिद्धेश बाथम, सिद्धेश सुभेदार आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.