पादचारी पूलाचे काम प्रगतीपथावर

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामे मध्य रेल्वेकडून सुरु आहेत. नेरळ स्थानकातील फलाट 1 वर आणखी एका पादचारी पुलाची निर्मिती मध्य रेल्वेकडून सुरु आहे. या नवीन पादचारी पुलाचे काम अंतिम टप्य्यात असून काही दिवसांनी या पुलाचे काम पूर्ण होणार असून स्काय वॉकचे काम पूर्ण झाल्यावर हा पादचारी पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेवरील मुख्य लाईन वरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात दोन पादचारी पूल आहेत. परंतु, मुंबई भागातून येणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नेरळ स्थानकात फलाट 1 वर आणखी एक पादचारी पूल बांधला जात आहे. या स्थानकात ब्रिटिश काळात ज्या ठिकाणी पादचारी पूल होता अगदी त्याच ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधला जात आहे. हा पादचारी पूल केवळ पायर्‍यांचा असून या ठिकाणी असलेला जुना पादचारी पुलाच्या मुख्य भागाला या पायर्‍या जोडल्या जाणार आहेत.

Exit mobile version