झायलोच्या धडकेत पादचारी जखमी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावपासून 9 किमी अंतरावर असणार्‍या इंदापूर बसस्थानकाच्या आवारात पाठीमागील बाजूस जोरात वेगाने जाणार्‍या झायलो कारची धडक एका पादचारी इसमाला लागून तो जखमी झाला. सदरचा अपघात सोमवारी (दि.25) रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला. याची फिर्याद रवींद्र मल्लिकार्जुन विजापुरे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी कि, यातील फिर्यादी रवींद्र मल्लिकार्जुन विजापुरे हे इंदापूर बसस्थानकातील बाथरूमकडे जात असताना बसस्थानकातील प्रवेश विभागातून एक पांढर्‍या रंगाची झायलो कार स्थानकाच्या आवारात वेगाने जात असताना फिर्यादी रवींद्र विजापुरे यांना धडक दिल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. सदर अपघातानंतर कारचा चालक या पादचार्‍याला कोणतीही वैद्यकीय मदत न देता तेथून निघून गेला. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.229/2021 भादवि संहिता कलम 279, 337 मोटार वाहन कायदा कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या अधिक तपास सपोनि वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Exit mobile version