। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोन गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर 9.200 येथे डाव्या बाजूच्या लेनवरून पायी जाणाऱ्या इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचा रंग गोरा, बांधा मध्यम आणि चेहरा उभट आहे. अपघाताच्या वेळी त्याने काळी पँट आणि काळा शर्ट परिधान केला होता. मृताची ओळख पटविण्यासाठी पनवेल तालुका पोलीस नातेवाइकांचा शोध घेत आहेत. या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित काकडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
