| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने कर्जत येथील मैदानावर मर्यादीत षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पेण फोटोग्राफर्स संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून, व्दितीय क्रमांक कर्जत फोटोग्राफर्स, तृतीय क्रमांक रोहा फोटोग्राफेर्स तर अलिबाग फोटोग्राफर्स संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
स्पर्धेत अष्टपैलू खेळ करून दाखवित पेण संघाच्या शैलेश पाटीलने मालिकाविर होण्याचा मान पटकाविला. अलिबाग संघाच्या राकेश शिर्के उत्कृष्ट फलदांजाचे पारितोषिक पटकाविले असून पेण संघाच्या विनोद बामुगडे याला उत्कृष्ट गोलंदाज आणि रोहा संघाचा दीपक मोरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले. सामन्यांचे उद्घाटन कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, मुंबई येथील राहूल सेल्सचे मालक हरिषभाई शहा, रायगड फोटोग्राफेर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते.
या स्पर्धेत रायगड जिल्हातील अलिबाग, पेण, खोपोली, कर्जत, रोहे, नागोठणे आणि महाड संघानी सहभाग घेतला होता. कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक संकेत भासे, अरुणा वायकर, जान्हवी देवघरे, ज्येष्ठ पत्रकार संजय मोहिते, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, सहसचिव दीपक बडगुजर, खजिनदार जितेंद्र मेहता, कार्यकारिणी सदस्य अविनाश राऊत, सुशील घाटवळ, कर्जत फोटोग्राफेर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कुंभार, प्रशांत गुरव, निलेश थोरवे, भरत भुरे, ओमकार दळवी, अजय गुंजाळ व सर्व सदस्य उपस्थिती होती. फोटोग्राफीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मनावरील ताण कमी करण्यासाठी त्याचबरोबर सर्वानी एकत्र येण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन च्या वतीने कर्जत येथील मैदानावर मर्यादीत षटकांच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या संपूर्ण स्पर्धेचे कर्जत फोटोग्राफेर्स असोसिएशनने दिमाखदार नियोजन केले होते.
पेण फोटोग्राफर्स संघ विजेता
