पेण | वार्ताहार |
पेण तालुका शेतकरी कामगार पक्षाची महत्वपूर्ण बैठक रविवारी (21 नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यया बैठकीत दि. 23 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आलेल्या घेराव मोर्चासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. ही बैठक पक्ष कार्यालय पेण बाजार समिती येथे होणार असून या बैठकीला आ.धैर्यशील पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पेण तालुका शेकाप चिटणीस संजय डंगर यानी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले आहे.यामध्ये तालुक्याील जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती, सदस्य, खरेदी विक्रि संघ अध्यक्ष, संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच पक्षाचे विभागीय चिटणीस यांना या बैठकील उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यालयाला घेराव घालण्याच्या संदर्भात नियोजनाबाबत चर्चा होणार आहे.