विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक; विविध गटांत विद्यार्थ्यांनी पटकावले यश
| खरोशी | प्रतिनिधी |
पेण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे उत्साहात संपन्न झाल्या. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पेण शर्मिला शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बीट विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, दत्तात्रय कोठेकर, स्पर्धा समन्वयक पुरुषोत्तम म्हात्रे आणि प्राचार्य संतोष नाईक यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.
इयत्ता तिसरी ते पाचवी गटात स्वानंदी संदीप पाटील (प्रथम, राजिप शाळा सोनखार), पारस अमोल एकडे (द्वितीय, कारमेल स्कूल पेण), कस्तुरी सुनील पाटील (तृतीय, राजिप शाळा खारपाडा) यांनी यश मिळविले. सहावी ते आठवी गटात स्वरा सुयोग पाटील (प्रथम, कारमेल स्कूल पेण), सिराज दिनकर पाटील (द्वितीय, राजिप शाळा खारपाडा), इच्छा यशवंत वर्तक (तृतीय, जी. के. म्हात्रे स्कूल वाशी) यांनी क्रमांक पटकावले. नववी ते बारावी गटात स्वरा दिनेश वाघमारे (प्रथम, आनंद शाळा पेण), जिनल चेतन पाटील (द्वितीय, जनता हायस्कूल गडब), युगा संतोष म्हात्रे (तृतीय, कोएसो बा. ग. ठाकूर विद्यालय वढाव) यांनी यश संपादन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पेण पंचायत समितीचे साधन व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, बीट विस्तार अधिकारी तसेच सार्वजनिक विद्यामंदिरच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
