खोपोली | प्रतिनिधी |
शिळफाटा इंदिरा चौकातील अरूंद रस्त्यावरून वाहनांची अत्यंत वर्दळ असते. दररोज होणाऱ्या वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे आणि पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून इंदिरा चौकात बॅरिकेट्स लावून अवजड वाहतूक वळविल्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसविण्यात यश आले होते. मात्र चारचाकी, अवजड वाहने बिनधास्तपणे नो एंट्रीतून घुसत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी सकाळपासून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.
शिळफाटा इंदिरा चौकातून पुण्याहून मुंबईकडे जाणारा तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या येथेन मुंबईकडे जाणाया एकेरी महामार्ग असला तरी दररोज सकाळी 1 ते 12 आणि सायं. 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहनांची अत्यंत वर्दळ असल्यामुळे शिळफाट्यावर वाहतूक कोंडी होते. यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकारी, प्रशासक अनुप दुरे आणि पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करून अवजड वाहतूक दुध डेअरी मार्गे खोपोलीच्या दिशेने वळविल्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसविण्यात यश आले होते. मात्र, वाहतूक पोलिसांची नजर चुकवून नो एंट्रीतून वाहने बिनधास्तपणे घेऊन जाणाऱ्या चालकांवर वाहतुक पोलिस प्रशांत बोंबे,धम्मानंद वावळ,धिरज तुपे,प्रविण रणमाळे दंडात्मक कारवाई केली आहे.