• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

भेदक, दाहक फिरकी आणि व्यक्तिमत्वही!

Santosh Raul by Santosh Raul
October 26, 2023
in अलिबाग, क्रीडा, देश, नवी दिल्ली, राज्यातून, रायगड, लेख, संपादकीय
0 0
0
भेदक, दाहक फिरकी आणि व्यक्तिमत्वही!
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बिशनसिंग बेदी! फक्त नावच पुरेसे आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचे वर्णन करण्यासाठी. त्याची गोलंदाजीची मोजवयाच पावलांची चाल आणि त्यानंतर चेंडू टाकल्यानंतरची करामत. क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा एक अध्यायच लिहून गेली. डावखुरी फिरकी जेवढी भेदक, तिखट आणि परिणामकारक होती, तेवढेच त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी, प्रखड आणि स्पष्टवक्तेपणाचे होते. खेळपट्टीवर पडलेला त्याचा चेंडू ज्या त्वेषाने वर उसळायचा आणि वळायचा तेवढाच मैदानाबाहेरचा बिशन अन्यायाविरूद्ध पेटून उठायचा. त्यामुळेच एकीकडे डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून त्याची कारकिर्द बहरत असताना, दुसरीकडे अनेक वादाच्या ठिणग्याही पडत होत्या. नामवंत फलंदाजांना जशी त्याची फिरकी गोलंदाजी कधीही कळली नाही तसंच माणूस म्हणूनही बिशन समाजाला कधीही समजला नाही. अगदी त्याच्या आप्तस्वकियांना, क्रिकेट संघांतील त्याच्या नजिकच्या सहकाऱ्यांनाही तो कधीही उमगला नाही. क्रिकेट पदाधिकारी आणि त्याचे उभे वैर होते. हे वैर त्याने स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेले नव्हते तर क्रिकेटपंटूवर अन्याय होताना तो स्वस्थ बसू शकायचा नाही. वैयक्तिक जीवनात त्याने ऑस्ट्रेलियन पत्नीबरोबर केलेला संसार बऱ्याच कालावधीनंतर मोडला. त्यानंतर मात्र त्याने भारतीय पत्नीसोबत उर्वरित आयुष्य आनंदात घालविले. बिशनला वाचनाची प्रचंड आवड होती. तेवढाच तो पाककलेतही वरच्या दर्जाचा बल्लवाचार्य होता. त्याच्या या दोन आवडी त्याच्या मुलांमध्ये होत्या. त्यापैकी अंगदने पाककलेतही नाव कमाविले होते. एकंदरीत हवाहवासा वाटणारा हा क्रिकेटपटू होता. मात्र त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्यातील दाहकता जाणवायची. त्याचे चटकेही बसायचे. समोरच्या दोषी व्यक्तींना आणि सोबतच्यांनाही. तो स्पष्टवक्ता होता. आणि स्पष्टवक्ता व्यक्तीच्या वाट्याला येणारी हेटाळणीही त्याने सहन केली. तो क्रिकेटमधील ढोंगी प्रशासकांना नडला. त्यांचे बुरखेही त्याने फाडले.

1967 ते 1979 या कालावधीत बिशनसिंग बेदी यांच्या 67 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत डावखुऱ्या फिरकीची कला तमाम क्रिकेट विश्वाने पाहिली. 67 कसोटीतील 266 बळी त्यांच्या डावखुऱ्या फिरकीला मिळालेली योग्य दाद नाही. कारण बेदी यांच्या काळात जगातील फलंदाजांच्या विकेट वाटून घेण्यासाठी आणखी तीन ग्रेट फिरकी गोलंदाज वाटेकरी होते. त्यामुळे डावातील 10 आणि सामान्यातील 20 बळी नेहमी चौघांमध्ये विभागले जायचे. प्रसन्ना, चंद्रशेखर आणि वेंकटराघवन हे भिन्न शैलीचे फिरकी गोलंदाज भारतासाठी जवळजवळ एकच कालखंडात खेळले. इंग्लिश कौंटी नॉर्दम्पृतशायरच्यावतीने बिशन यांनी कारकिर्द गाजविली. सतत सराव करून फिरकी गोलंदाजीवर त्यांनी हुकूमत मिळविली होती. गोलंदाजीच्या सरळ-सोपा रनअप सहज सुंदर चाल आणि एकाच ॲक्शनने टाकलेल्या चेंडूची विविधता. त्यांच्या सहज सुंदर शैलीमुळे क्रिकेट पाहताना आगळावेगळा आनंद मिळायचा. अमृतसरच्या रस्त्यांवर लहानपणी संगमरवरी दगडांनी खेळत खेळत मोठा झालेला हा क्रिकेटपटू ते दगड हाताळल्यामुळे कणखर मनोवृत्तीचा बनला. कोणताही अन्याय त्याने कधीही सहन केला नाही. खेळत असताना खेळाडू म्हणून, कप्तान म्हणून आणि नंतर प्रशिक्षक, व्यवस्थापक, निवड समिती सदस्य म्हणूनही. त्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या क्रिकेटचा फायदा झाला. पण नंतर त्याआधी त्या संघर्षाच्या आगीत बिशनसिंग नामक एक व्यक्तिमत्व होरपळून गेले.

मद्रास कसोटीत इंग्लंडच्या जॉन लिव्हर या गोलंदाजाने व्हॅसलिनचा वापर करून भारतीय फलंदाजांची दाणादाण उडविली. त्यावेळी रंगेहाथ पकडलेल्या जॉन लिव्हर या गोलंदाजाला शिक्षा झाली नाहीच. उलट बिशनसाठी इंग्लिश कौंटीचे दरवाजे कायमचे बंद झाले. कप्तान असताना बिशनसिंग बेदी अन्यायाला अंगावरच घ्यायचा. नागपूर येथील कसोटीचा किस्सा त्यांनी सांगितला होता. नागपूरच्या एमएलए हॉस्टेलमध्ये संघ राहत होता. खेळाडूंना आंघोळीला ऐन थंडीत गरम पाणी मिळाले नाही. म्हणून बेदी यांचा पारा चढला होता. त्यांनी असोसिएशनच्या सचिवांना सांगितले, लोक तुम्हाला नाही तर आम्हा खेळाडूना पहायला येणार आहेत, तेव्हा गरम पाण्याची तडक व्यवस्था करा. गरम पाणी काही आले नाहीच. परंतु गरम झालेल्या त्या पदाधिकाऱ्याने बेदी आणि त्याच्या सहकाऱ्यांसाठी रेल्वेचे फर्स्टक्लासचे तिकिट बुक केले नाही. बेदी आणि त्यांचे सहकारी ‌‘अनरिझर्वड’ बोगीतून, सामान्यांसाठीच्या डब्यातून थंडीत प्रवास करण्याची शिक्षा भोगत होते. असे अनेक किस्से बेदी यांच्या हाती सूत्रे असताना घडले आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना एका दौऱ्यात खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर नाराज झालेले बेदी म्हणाले होते, ‌‘तुम्हाला अरबी समुद्रात बुडवायला पाहिजे.’ पण भारताने वेस्ट इंडिजवर 406 धावांचा पाठलाग करून मिळविलेला पोर्ट ऑफ स्पेनमधील ऐतिहासिक विजय बेदी यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांना क्रिकेटच्या कलेचे व्यापारीकरण, विकृतीकरण केलेले कधीच आवडले नाही. कसोटी क्रिकेटचे ते समर्थक होतेच. मात्र ट्वेेन्टी-20 क्रिकेट हे क्रिकेटच नव्हे असे त्यांचे ठाम मत होते. आयपीएल स्पर्धा त्यांना कधीच रूचली नाही. यातले पैसे येतात कुठून आणि जातात कोठे या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर अजूनही कोणीही देवू शकले नाही.

दिल्लीच्या फिरोझशहा कोटला मैदानाला राजकारणी अरूण जेटली यांचे नाव देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. बिशनसिंग बेदी आणि सुनील गावसकर या तत्कालीन दोन महान क्रिकेटपटूंमध्ये व्यक्तिमत्वाची लढाई व्हायची. मात्र त्या शीतयुद्धात भारतीय क्रिकेटचे नुकसान त्यांनी होऊ दिले नाही. दोघेही एकमेकांचे विरोधक होते पण तेवढेच एकमेकांच्या चांगल्या गुणांचे कौतुकही करायचे. असा हा विविधांगी, विविधढंगी, क्रिकेटपटू मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कृतींमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात राहिला. तरी त्यांचे जाणे मनाला चटका लावणारेच!

Email: vinayakdalvi41@gmail.com

Related

Tags: alibagbishansingh bedicricketcricket indiacricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल

Next Post

विश्वचषक गतविजेता संघ तळाशी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

लाडक्या बहिणींची पुन्हा धावाधाव

March 24, 2026
Next Post
विश्वचषक गतविजेता संघ तळाशी

विश्वचषक गतविजेता संघ तळाशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?