। अलिबाग । प्रतिनिधी ।
गतका मार्शल आर्ट ही रायगड जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच अलिबागमध्ये पार पडली. या स्पर्धेत पेणच्या मुला-मुलींनी सुवर्ण कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचा चषक पटकावला.
उत्कृष्ट कराटेपट्टू अशांक पाटील याने दुहेरी सुवर्णपदक पटकावून तो रायगड जिल्ह्याचा आणि त्या चॅम्पियनशिपचा पहिला विद्यार्थी ठरला. सुचित म्हात्रेनी स्ट्रीट फाईटमध्ये सुवर्णपदक, प्रतीक म्हात्रे याने स्टिक रोटेशनमध्ये सुवर्ण, आणि साईराज पाटील याने अंतिम सामन्यात अलिबागच्या मुलाचा पराभव करून सुवर्णपदक तसेच दिया म्हात्रे हिने उत्कृष्ट कामगिरी बजावून सुवर्णपदक पटकावले.
आदित्य झिंजे, सुरज म्हात्रे, पेणची सुवर्णकन्या सेजल पाटील हिनेे प्रेक्षणीय स्ट्रीक फाईट प्रकारात विजय मिळवला असून सम्रा कांबळे, सानिया म्हात्रे हिने पहिल्यापासूनच स्ट्रीट फाईटमध्ये सुवर्णपदक पटकावले. एकूण 11 सुवर्णपदके संपादन करून रायगड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. जिल्हा संघटनेची कार्याध्यक्ष अलिबागच्या नयना शिलदनकर व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संतोष कवळे, जिल्हा संघटनेचे सचिव रोहन अरुण गुरव यांच्या हस्ते चषक देण्यात आले. या विजयी स्पर्धकांची राज्यस्तरीय गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे.