पेणचा जलतरणपटू नेपाळमध्ये चमकला

संकेत म्हात्रेची दोन सुवर्णपदकांची कमाई

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील पाटणेश्‍वर गावचा सुपुत्र संकेत केशव म्हात्रे याने नेपाळ येथे दि.16 ते 20 दरम्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.

संयुक्त भारतीय खेळ फाऊंडेशनच्या वतीने ओपन इंटरनॅशनल चॅम्पिअनशिप (नेपाळ-पोखरा) 2022 या जलतरण स्पर्धेत संकेत केशव म्हात्रे याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत 100 व 200 मीटर या प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. संकेत म्हात्रे हा नवी मुंबई पोलिसमध्ये कार्यरत असून, त्याने आपला सराव प्रशिक्षक मदन धर्मा काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत केला आहे. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती. त्याच्या या निवडीचे सार्थक करत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याच्या यशामुळे पूर्ण पाटणेश्‍वर गाव आनंद व्यक्त करत असून, सर्व स्तरातून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version