मयत विष्णू पाटीलच्या वारसांना पेन्शन मंजूर

। उरण । वार्ताहर ।
बोकडविरा वायू विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटातील मयत विष्णू पाटील यांच्या वारसांना म्हणजे पत्नी, मुलगी व आईला राज्य विमा निगम डेथ बेनिफीटच्या माध्यमातून पेन्शन मंजूर झाली असल्याची माहिती जि.प.चे माजी सदस्य विजय भोईर यांनी दिली.

बोकडविरा येथील वायू विद्युत केंद्रात दि. 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण स्फोटात दोन कायसवरूपी व एक कंत्राटी असे तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. यातील कंत्राटी कामगार विष्णू पाटील यांच्या वारसांना कर्मचारी राज्य विमा विभागाकडून दरमहाचे पेन्शन मंजूर झाले आहे. परंतु, कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव अद्याप प्रतीक्षेत असल्याचे समजते.

मयत कामगार विष्णू पाटील यांच्या वारसांना कंपनीत कायमस्वरूपी नोकरीत घेण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. तशा प्रकारचा प्रस्ताव महाजनकोच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, तो आजही प्रतीक्षेत असल्याचे समजते.

मात्र, राज्य कर्मचारी विमा निगमकडून मयत विष्णू पाटील याला पेन्शन देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ती पुढीलप्रमाणे पत्नी 17,014 रुपये, मुलगी व आईस प्रत्येकी 11,343 रुपये पेन्शन मंजूर करण्यात आली असल्याची माहिती विजय भोईर यांनी दिली आहे. ही पेन्शन कर्मचार्‍यांनी राज्य विमा निगम (एडखउ) कडून मंजूर झाल्याचे सांगितले.

Exit mobile version