वाढत्या उकाड्याने जनता हैराण

ज्यूस, ताक, लस्सी आदी शीतपेयांना वाढती मागणी

| कोलाड | वार्ताहर |

दिवसेंदिवस तापमानात वाढ होताना दिसत असून, तापमानाचा पारा 40 अंशांपेक्षा वर गेला असल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, यामुळे ज्यूस, ताक, लस्सी आदी शीतपेयांना नागरिक जास्त पसंती देत आहेत. त्यामुळे यांची मागणी वाढली आहे.

वाढते प्रदूषण व सतत होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाने रानेवने ओस पडू लागली असून, रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. यामुळे वाढत्या तापमाणामुळे नागरिक हैराण झाले असून, शरीराचा दाह कमी करण्यासाठी विविध शीतपेय, ज्यूस, ताक, लस्सी याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.

आताच उष्णतेचा पारा 40 अंशांच्या वर गेल्याने सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. भरमसाठ वृक्षतोड त्याचबरोबर लावले जाणारे वनवे यामुळे जनसंपदा नष्ट होत चालली आहे. परिणामी, परिसर व रस्ते आग ओकताना दिसत आहेत. या सर्व दाहक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी नागरिक थंडगार शीतपेय, ताक, लस्सी, लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाचा रस याचा आधार घेताना दिसत आहेत.

Exit mobile version