दिवाळी सुट्टीसाठी गेलेल्यांना खासगी वाहनांचा आधार

। सुतारवाडी । वार्ताहर ।
एस.टी. संपाने आता उग्र रूप धारण केलेले पाहवयास मिळत असून एस. टी. ने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. दिवाळी सुट्टीत आपल्या गावाकडे गेलेल्या शिक्षकांना 11 नोव्हेंबर पासून शाळा सुरु झाल्या त्याच दरम्यान दिवाळी सणापासून सुरू झालेला एस.टी.चा. संप अद्यापही न मिटल्यामुळे शाळा सुरु झाल्याने खर्चीक वाहनाने शाळेच्या ठिकाणी परतावे लागले. मुंबई – गोवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने दिसत आहेत. एस. टी. ची दरवाढ त्याच प्रमाणे दीर्घ काळ चालणारा एस.टी. चा संप यामुळे, प्रवासी हैराण झाले असून खासगी वाहनाने प्रवास करणार्‍यांची संख्या आता वाढत चालली आहे.

Exit mobile version