महाडमधील दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही

ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी व प्रमाण पत्राच्या वाटपाला सुरुवात
। महाड । प्रतिनिधी ।
अमृत महोत्स निमित्त महाड ग्रामीण रुग्णालयात महाड पोलादपूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीना शुक्रवार पासून तपासणी आणि प्रमाण पत्राचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी या प्रमाण पत्रा साठी दोन्ही तालुक्यातील सुमारे २५० लोकांची तपासणी करून यांना प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले. यासाठी महाड ग्रामीण रुग्णालय, माणगाव उपजिल्हा रुग्णालय आणि अलिबाग जिल्हा रुग्णालय येथील डॉक्टरांनी भाग घेतला होता.

नवीन शासनाच्या धोरणा प्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या तालुका स्थरावर दिव्यगांची तपासणी होऊन त्याच ठिकाणी त्यांना प्रमाण पत्र मिळावे असे धोरण असून अमृत महोत्सव निमित्त या धोरणाला महाड ग्रामीण रुग्णालयात सुरवात करण्यात आली. आज पर्यंत महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दिव्यांग्याना प्रमाणपत्रा साठी अलिबाग १२० किलोमीटर अंतरावर जावे लागत असे त्या मुळे मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागत होता. मात्र या शासनाच्या धोरणा मुळे या दिव्यांगाना एक दिलासा मिळाला आहे.

महाड पोलादपूर तालुक्यात सुमारे ६०० दिव्यांग व्यक्ती आहेत. त्या मधून २५० लोकांची शुक्रवारी महाड ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन त्यांना प्रमाण पत्राचे वाटप ही करण्यात आले. या पुढे ही अशाच प्रकारे तपासणी आणि प्रमाण पत्र वाटप दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सुरू राहणार आहे, येत्या ऑगस्ट पर्यंत महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दिव्यगांची तपासणी आणि प्रमाण पत्र देण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक भास्कर जगताप यांनी दिली. त्याच बरोबर या ठिकाणी दर महिन्या मध्ये मतीमंद मुलांच्या तपासणीचा देखील कॅम्प घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

दिव्यांग लोकांची तपासणी महाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर समीर शेलार, डॉक्टर दीपक अडकमोड तसेच माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ शंतनू डोईफोडे, डॉ तुषार शेठ यांनी केली तर प्रमाण पत्र देण्या साठी अलिबाग मधून दिव्यांग प्रमाण पत्र विभाग प्रमुख प्रतिमा फडतरे, डॉक्टर अंकिता करंबळे, सुशील साईकर, ज्ञानदीप भोईर, प्रतिमा सुतार, समाधान चौधरी, गणेश भोसले, रुपेश म्हात्रे, कीर्ती कुंभार, मंगेश म्हात्रे होते.

दिव्यांग तपासणी आणि प्रमाण पत्र वाटप कार्यक्रच्या वेळी महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदळवाड, तहसीलदार सुरेश काशीद, नगर पालिका मुख्य अधिकारी महादेव रोडगे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, ग्रामीण रुग्णालय पोलादपूर च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्य रेखा पाटील, महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ भास्कर जगताप तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर हजर होते.

Exit mobile version