जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती, दरड कोसळणे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणच्या जनतेला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून अॅम्ब्युलन्स स्टेशन सुरु करण्यात आले.
जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी अॅम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी म्ब्युलन्स स्टेशन तयार करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, वाहन चालक उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी म्ब्युलन्स स्टेशन तयार करण्यात आले असून अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती, दरड कोसळणे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील नागरिकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.