| माणगांव | वार्ताहर |
लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान माणगांवतर्फे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विद्युत प्रकाश झोतातील खुल्या आमदार चषक 2024 पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन 10 ते 11 फेब्रुवारी रोजी अशोकदादा साबळे विद्यालय माणगांव येथे करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत तालुक्यातील व जिल्ह्यातील कबड्डी संघानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकास 21000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास 15000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास 11000 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकास 7000 रुपये व आकर्षक चषक, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 3000 रुपये व आकर्षक चषक, उत्कृष्ट पकड 2000 रुपये व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाईपट्टू 2000 रुपये व आकर्षक चषक तर जिल्हास्तरीय स्पर्धेकरता प्रथम क्रमांक 51000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 31000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 21000 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 11000 रुपये व आकर्षक चषक,स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 5000 रुपये व आकर्षक चषक, उत्कृष्ट पकड 3000 रुपये व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाईपट्टू 3000 रुपये व आकर्षक चषक अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा रायगड जिल्हा कबड्डी असोशिएशनअध्यक्ष आस्वाद पाटील, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव सभापती रमेश मोरे यांच्याहस्ते होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी समाधान उतेकर 7559497094, राजेंद्र सुर्वे 9356343306, सिद्धेश पिंगळे 9272305277, प्रसाद धारिया 99222183232 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.