गायमुखातून वाहते बारमाही पाणी

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील कुडा लेणी, तळगड किल्ला यांसह निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गायमुख पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. गायीच्या मुखातून बारमाही वाहणारे पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. तालुक्यातील पर्यटनाला वाव देणार्‍या ठिकांणांमध्ये चालना मिळत असणारे गायमुख नावारूपाला येत आहे. निसर्गाने नटलेल्या या परिसरात डोंगर दर्‍यांनी व वृक्ष लतांनी नटलेल्या या भागात पर्यटन बहरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबई-गोवा हायवेपासून तळा मार्गे व खरवली आमडोशी मार्गे अंदाजे 20 की.मी अंतरावर गायमुख हे गाव असून गावाजवळ असलेले गायमुख पाहण्यासाठी तळा तालुक्यासह रायगडातील अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. येथील गायमुखातून सतत पाणी सर्व ऋतूंमधे वाहते विशेष म्हणजे हे पाणी येणारे पर्यटक आवर्जून पितात.

गायमुख पन्हेळी या भागात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पहावयास मिळतात. या विविधतेने नटलेल्या भागात एकदा का पर्यटक आले की या भागातील निसर्गात सारे पर्यटक रमून जातात. शांत व शितल असे उन्हाळी पावसाळी वातावरण असल्याने हा परिसर हवाहवासा वाटतो. येथील मातीत धातूचे गुणधर्म असल्याचे येथिल नागरिक सांगतात.तळा तालुक्यातील हे गायमुख पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. या गायमुखातून सतत पाणी सर्व ऋतूंमधे वाहते विशेष म्हणजे हे पाणी पर्यटक आवर्जून पितात. तसेच, पावसाळ्यात धबधब्यांचे नयनरम्य असे दर्शन पर्यटक मनमुराद लुटताना दिसतात. पावसाळ्यात तर धबधब्यांचे नयनरम्य असे दर्शन घडतं असते. या भागातील धबधब्यांचा आनंद पर्यटक मनमुराद लुटताना पावसाळ्यात पहावयास मिळते.

Exit mobile version