। तळा । वार्ताहर ।
तळा-उसर येथील अभिनव ज्ञान मंदिरात दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात रायगड जिल्हा परिषद गायमुख शाळेची विद्यार्थिनी प्रिया गिरी हिने (गट 6वी ते 8वी) वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच, वाढत्या ग्लोबल वॉर्मिगचा धोका पाहता सौरऊर्जेवर आधारित प्रतिकृतीची सुबक मांडणी शाळेतील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.
तळा तालुक्यातील रा.जि.प. गायमुख शाळा ही उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. मागील दोन वर्षात शाळेने विविध प्रकारे स्पर्धेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय उराशी बाळगून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक मुख्याध्यापक, शिक्षक हे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणाबरोबरच मंथन, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा तसेच इतर उपक्रमात सहभाग देऊन त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे गायमुख शाळेला सुवर्णकाळ प्राप्त झाला असून आदर्श शाळा म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.