। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बूस्टर डोसच्या चाचण्यांसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. तिसर्या डोसच्या फेज-3 चाचणीसाठी अर्ज सादर करणारी भारत बायोटेक ही दुसरी कंपनी आहे. इंट्रानेसल लसींमध्ये, ओमिक्रॉनसह विविध कोरोना 19 प्रकारांचे संक्रमण रोखण्याची क्षमता आहे. या इंट्रानेसल लसीचा डोस देशात कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला तोंड देण्यासाठी मदतगार ठरेल. नाकातून देण्यात येणार्या या कोरोना लसीची देशात नऊ ठिकाणी चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, भारत बायोटेकने म्हटले आहे की, नाकातून देण्यात येणारी लस कोव्हिड-19 चे संक्रमण रोखण्यासाठी खूप प्रभावी आहे.देशाता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेगही वाढवा यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या देशातील दोन कोरोना प्रतिबंधक लसींना जनरल ऑफ इंडियाने खुल्या बाजारात विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. या दोन्ही लसींच्या निर्मिती कंपन्या सीरम आणि भारत बायोटेकनं यासाठी परवानगी मागितली होती.