व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न करण्यात आली. रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डायरेक्टर निखिल दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत व साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेस अमित चौधरी, संदीप विचारे, अश्‍विनी विचारे, संदेश गमरे, विनोद पाटील, तौसिफ येरूणकर, मुख्याध्यापक दिपक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत लाला लजपतराय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईचे प्रो.डॉ. गौतम त्रेहन व प्रो. कविता पाटील या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित शिक्षकांना व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अधिक विकसित करून व त्यांच्यातील गुणवत्तावाढीसाठी सदर उपक्रमाचे उद्दिष्ट असून, या उपक्रमाची सुरूवात ही शिक्षकांना प्रशिक्षण देऊन व त्यांना अधिकाधिक विकसित करण्याच्या ध्येय धोरणानुसार या उपक्रमाची सुरूवात ही शिक्षकवर्गाला प्रशिक्षण देऊन करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version