| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या भातपीक पाहणी आणि फळपीक पाहणी करण्यात येत आहे. भातपिकावरील किडींचा प्रादुर्भाव याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कर्जत तालुक्यातील मौजे वदप, गौरकामत, अरवंद तसेच बारणे या गावामध्ये भात आणि आंबा पिककिड यांची पाहणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या शेतात जावून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी कृषी अधिकारी यांच्यासोबत कृषी शास्त्रज्ञदेखील सहभागी झाले. भातपिकावरील रोगराईबाबत अंतर्गत डाळ मिल प्रकिया मशिनची पाहणी डॉ. बी.डी. शिंदे तसेच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्रद्यपक क्रॉप सॅप व होर्ट सॅप प्रकल्प समन्वययक आणि कीटक शास्त्र विभाग डॉ डी. बी. शिंदे यांनी केली. त्यावेळी कृषी विभागाचे पर्यवेक्षक सुदर्शन वायसे, कृषी सहायक स्मिता गावडे, राजश्री तायडे आदी सहभाग घेतला होता.
यावेळी कृषी सहाय्यक दहिवली तर्फे निडसमवेत शेतकरी विनय वेखंडे वदप, दशरथ मुने बारणे आणि अनिल देशमुख गौरकामत तसेच इतर शेतकरी यांनी आपल्या समस्या शास्त्रज्ञ डॉ. शिंदे यांच्यासमोर मांडल्या.