तात्काळ सुनावणीसाठी याचिका

सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे गटाची नवी चाल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा, अशी मागणी करत शिंदे गटाकडून त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लागणे महत्त्वाचे असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

Exit mobile version