| मुंबई । वृत्तसंस्था ।
अगोदरच महागाईने सर्वसामान्य लोकांना बेहाल करून टाकले आहेत. यातच देशात पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल -डिझेलचेआजचे नवे भाव जारी केले आहेत. आज देखील पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जवळ पास १ महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या भावात स्थिर आहेत.
या अगोदर ६ एप्रिल दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन भावानुसार, राष्ट्रीय राजधानीमध्ये १ लिटर पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. डिझेलचे९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलसाठी १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या भावानुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोलचे १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा भाववाढ केली होती.
मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
.







