उरण तालुक्यात पेट्रोल, डिझेलचा तुडवटा

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील एच.पी.आणि इंडियन ऑईल पेट्रोल व डिझेल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुडवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना आपआपली वाहने पंपावर, रस्त्यावर पार्किंग करुन ठेवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल सुरू असते. अशा वाहनांना इंधन म्हणून पुरवठा करणारे एच.पी.आणि इंडियन ऑईलचे जवळ जवळ 16 पेट्रोल व डिझेल पंप आहेत. परंतु गेली तीन चार दिवसांपासून काही पेट्रोल व डिझेल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुडवटा निर्माण झाला आहे. त्यात सध्या तालुक्यातील 10 ते 12 पेट्रोल व डिझेल पंपावर पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी पंपावर ये-जा करणार्‍या वाहनांना एकत्र आपली वाहने पेट्रोल व डिझेल अभावी पंपावर किंवा रस्त्यावर पार्किंग करुन ठेवण्याची वेळ आली आहे.


पेट्रोल पंप व्यापारी वर्गाने, असोसिएशनने कोणत्याही प्रकारची सुचना न दिल्याने सोमवारी वाहनात पेट्रोल व डिझेल नसल्याने अनेक वाहनचालकांना आपआपली वाहने पंपावर, रस्त्यावर पार्किंग करुन ठेवण्याची वेळ आली आहे. कारण तालुक्यातील सर्रास पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा तुडवटा निर्माण झाला आहे. तरी यांची रायगड जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.

मागणी केली आहे तरी दोन दिवसात पेट्रोल डिझेलची गाडी येणार आहे.सध्या पंपावर पेट्रोल व डिझेल शिल्लक नसल्याने आम्ही वाहनचालकांना पेट्रोल व डिझेल देऊ शकत नाही.

तेजस भुजबळ, मॅनेजर, एचपी पेट्रोल पंप भेंडखळ
Exit mobile version