पेट्रोल पंपावर ग्रहकांची तोबा गर्दी
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा शहर व ग्रामीण भागात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहन चालक मालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काही पंप बंद आहेत, तर काही पंपावर ग्राहकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.
इराण-अमेरिका युद्ध पेटवल्यानंतर इराण देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे देशभरात कच्च्या तेलाची टंचाई जाणवत आहे. भारताकडे असलेल्या कच्चा तेलाचा साठा मर्यादित काळापुरता असल्याने नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तेलाचा वापर काटसरीने करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात खळबळ उडाली आणि पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी एकच गर्दी केली.
रोहा तालुक्यातील प्रत्येक पेट्रोल पंपवर सलग तीन ते चार दिवस वाहन चालकांनी गर्दी केल्याने पेट्रोल, डिझेलचा असलेला साठा संपल्याने काही पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल पंपचा मुख्यद्वार बंद करून पेट्रोल संपल्याची माहिती दिली.तर काही पेट्रोल पंपावर थोडाबहुत प्रमणात असलेला साठा विक्री होत असल्याने वाहन चालक व मालकांनी पंपावर तोबा गर्दी केली आहे. त्यात पेट्रोल, डिझेलविषयी समाज मध्यमावर मॅसेज व्हायरल झाल्याने लोकांनी आपल्या वाहनात पेट्रोलचा साठा उपलब्ध व्हावा म्हणून पंपावर तोबा गर्दी केली आहे.
