सुनील मांजरेकर यांना फाळके पुरस्कार

मिनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते गौरव

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यात सारळ येथील डॉ. सुनील मांजरेकर यांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.सुनील मांजरेकर यांचा 24 जून रोजी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार देऊन सिने अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. मांजरेकरांच्या पुरस्काराने अलिबागसह संपुर्ण रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहेत.

डॉ. सुनील मांजरेकर हे गेली 25 वर्ष दुबईत एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत. स्कॅन बुक कॉलिटी कसल्टनसी ही त्यांची नावाजलेली कंपनी आहे. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगातून नवीन उद्योजकांना बाजार कसा उपलब्ध करावा तसेच उद्योग व्यवसायातील स्किल यावर त्यांची कंपनी नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करीत असते. डॉ. सुनील मांजरेकर हे व्यवसायानिमित्त केवळ दुबईतच नव्हे तर अन्य देशांतही जात असतात. शिवाय त्यांना सांस्कृतिक क्षेत्राची रुची असल्याने दुबईतील मराठी फोरमचे अध्यक्ष म्हणून ही कार्यरत आहेत. जी.एम.बी.एफ या संस्थेच्या माध्यमातून मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. औद्यागिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

Exit mobile version