। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बागमळा शाळेतील शिक्षक सुनील गौरू पाटील यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. बाळमेळाव्याचे औचित्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आला. नागावच्या सरपंच हर्षला मयेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी नितीश पाटील, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, नितीन पाटील, नागाव केंद्राच्या केंद्रप्रमुख प्राची ठाकूर, दिपक फाळके, अजित पाटील, संदीप वारगे, रा. का. पाटील आदी मान्यवर, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते. केंद्र नागाव तर्फे बाळ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने सुनील पाटील यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल पाटील यांना पुरस्कार देण्यात आला.