स्वेरीतील मिलिंद कुलकर्णी यांना पीएचडी

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा.मिलिंद कुलकर्णी यांना डिस्पोजल ऑफ फ्लॉवर वेस्ट: बायोगॅस जनरेशन ऑप्शन अँड को- डायजेशन फिजीबीलिटीफ या विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
प्रा.डॉ.पी.एम.घाणेगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा.मिलिंद कुलकर्णी यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांना शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी आपला शोधनिबंध सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठामध्ये सादर केला होता.

Exit mobile version