। पंढरपूर । प्रतिनिधी ।
स्वेरीचे माजी विद्यार्थी, माळेगाव येथील प्रा.अमितकुमार रामचंद्र शेलार यांच्या ब्युटीफुल एन्काउंटर इन लाईफ या पुस्तकाचे प्रकाशन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.राऊत, स्वेरीचे माजी विद्यार्थी प्रा. पुरुषोत्तम पवार, स्वेरीचे विश्वस्त एच.एम.बागल, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते. प्रा. अमितकुमार शेलार यांनी 2014 साली स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाली.
हे पुस्तक ङ्गनोशन प्रेस मेडीया प्रायव्हेट लिमिटेडफने प्रसिद्ध केले असून या पुस्तकाची किंमत 199 रु. आहे. तसेच हे पुस्तक https://notionpress.com/read/beautiful-enounter-in-life या व इतर लिंक वर देखील उपलब्ध असून पुस्तक मागणीनंतर जवळपास 130 हून अधिक देशात या पुस्तकाची उपलब्धता आहे.