रायगडच्या पर्यटन विकासासाठी छायाचित्र स्पर्धा

। खांब-रोहे । वार्ताहर ।

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधताना रायगड जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एका विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटन स्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी ऍग्रो पर्यटन सहकारी सेवा या नियोजित संस्थेतर्फे निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, कासपठार, निसर्गरम्य दृश्य, नद्या, तलाव, प्राणीजीवन, गिर्यारोहण, ट्रेकिंग त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड, किल्ले आणि स्थळांची छायाचित्रे सादर करता येतील.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. 12 बाय 18 इंच 300 डी. पी. आय सोल्युशन असलेल्या छायाचित्राची ई-मेल द्वारे व व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर कॉपी दिनांक 25 सप्टेंबरपर्यंत खालील व्यक्तींकडे द्यावयाची आहेत.

स्पर्धकांनी आपली छायाचित्रे प्रवेश शुल्कासह (गुगल-पे नं. मो. 8879434166 9270035357 वर) रायगड चणेरा येथील छायाचित्रकार श्याम सरलेकर 9226929243 आणि गणेश भगत 8879434166 अतुल पाटील 9270035357 या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर छायाचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version