सुधीर नाझरे यांचे आवाहन
| नेरळ | वार्ताहर |
जागतिकस्तरावर चित्रकारांसारखे कार्य छायाचित्रकारांचे देखील आहे.चित्रकारांप्रमाणे छायाचित्रकारांना महत्व द्यावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार सुधीर नाझरे यांनी केले. नेरळ येथील नेरळ फोटोग्राफर असोसिएशनकडून आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना सुधीर नाझरे बोलत होते.
नेरळ फोटोग्राफर असोसिएशन यांच्याकडून नेरळ येथील श्री साईबाबा संस्थान येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नेरळ फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन केळकर,सचिव दिलीप मसणे,खजिनदार मनोज भोईर,राजेश विभुते,आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी कल्याण,डोंबिवली, कर्जत तालुका, खोपोली,पाली,पनवेल,रसायनी आदी भागातील छायाचित्रकार सहभागी झाले होते.या कार्यशाळेत मुंबई येथून निकॉन कंपनीचे सेल्स प्रतिनिधी उपस्थित होते.त्यांनी नवीन कॅमेरे आणि त्यातील वेगवेगळे बदल यांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.तर कार्यशाळेत सहभागी छायाचित्रकारांना नाझरेंनी छायाचित्र काढण्याच्या पद्धती आणि नवीन यंत्रणेची माहिती दिली.