छायाचित्रकारांची कार्यशाळा संपन्न

| पाली | वार्ताहर |
रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे पालीतील बल्लाळेश्‍वर हॉल क्र. 1 येथे नुकतीच छायाचित्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रतिभावंत छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेचे उद्घाटन पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार शशिकांत राणे यांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत व्यावसायिक छायाचित्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी फोटोग्राफीत उत्कृष्ट कामगिरी बजावत, वृत्तपत्र छायाचित्रकारच्या माध्यमातून मुरूडसोबत संपूर्ण रायगड नव्हे तर, महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रापार नेलेल्या छायाचित्रकार सुधीर नाझरे आणि पोलीस खात्यात छायाचित्रकार म्हणून विविध पुरस्कार प्राप्त केलेले रमेश कुथे यांना रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत सौरभ नाझरे, योगेश बोराणा, नितीन पाटील, नितीन शिर्के आणि निखिल भोईर हे विजेते ठरले.

यावेळी राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे, आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख अंकुश आपटे तसेच हरीष शहा, रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, कार्याध्यक्ष विवेक सुभेकर, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, पाली फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित सागळे, कार्यकारिणी सदस्य निलेश शिर्के, दीपक बडगुजर, अविनाश राऊत, चैतन्य पाटील, अनिरुद्ध जोशी, सुशील घाटवळ, दादा आर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये मुंबई येथील राहूल सेल्स, कॅनॉन प्रिंटर, निकॉन कॅमेरा, एसआरके लॅब, फ्यूजीफिल्म कॅमेरा, ए वन फ्रेम, साई इलेक्ट्रॉनिक, प्रवीण बनसोडे, अदित्य अल्बम आणि व्हिनस व्हेंचर यांनी आपले स्टॉल्स लावले असल्याने याचा फायदा उपस्थित छायाचित्रकारांना झाला.

Exit mobile version