| पाली | वार्ताहर |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गुरुवार (ता.9) पासून जागरूक पालक-सुदृढ बालक विशेष अभियान सुरु झाले. या अभियानांंतर्गत सुधागड तालुक्यातील नेणवली प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अधिकारी डॉ. निर्मल व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राजिप नेणवली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून संपन्न झाले.
या अभियानात अंगणवाडी बालकांना व शाळेतील मुला-मुलींना समुपदेशन, आरोग्य तपासणी मार्फत मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक औषध गोळ्यांचे वाटप वयोगटानुसार करण्यात आले. तसेच किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबीके, गणपत वरगडे व आशा सेविका उपस्थित होते.