| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील कर्नाळा खिंडीत पनवेल ते पेण मार्गावर एक पिकअप टेम्पो पलटी झाला. हा अपघात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला. सुर्दैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर तात्काळ पनवेल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेण्याची कार्यवाही केली. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुरळीत झाली.