। रेवदंडा । वार्ताहर ।
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मुरुड तालुक्यातील मिठेखार ग्रामपरिसरात शाईनस्टार क्रिकेट क्लब, मिठेखारच्या वतीने टेनिस बॉल मर्यादीत लाल बावटा चषक 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पि.पि.स्पोर्टस, रोठची सरशी झाली आहे. तर साळाबादेवी साळाव संघ व्दितीय, एम.सी.सी. चोरढे संघ तृतीय तर सत्संग येसदे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. याशिवाय, मॅन ऑफ द मॅच म्हणून अक्षय म्हात्रे, मालिकावीर म्हणून महेंद्र पाटील, उत्कृष्ट फलदांज म्हणून अक्षय कांबळी, उत्कृष्ट गोलदांज म्हणून अक्षय पाटील, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून जयेंद्र बलकवडे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फव्वाद यांची निवड करण्यात आली आहे. नुतन चेहेर ग्राऊंड येथे दि. 22 ते 24 जानेवारी या कालावधीत संपन्न झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून, या सोहळ्यास उसरोली सरपंच मनिष नांदगावकर, शेकापक्ष मुरूड तालुका सहचिटणीस सी.एम.ठाकूर, किशोर गायकर, विद्यार्थी संघटना अध्यक्ष विनायक चोगले, शरद चवरकर, सरपंच सुवर्णा चवरकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन जगदीश चवरकर तर स्कोअर लेखन धरणे गुरूजी यांनी केले.