| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे समुद्रमंथन 2.0 या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यूईस इंग्लिश मिडीयम कॉलेज उरण (एनएसएस युनिट) व पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूल वेश्वी (उरण) यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी मनसेचे संदेश ठाकूर, योगेश चिले, स्नेहल राजमाने, संजय मुरकुटे, सतीश पाटील, हितेश साळुंके, सुप्रिया सरफरे, प्रतीक अमृते, रितेश पाटील, आवेश ठाकूर, समीर म्हात्रे, गणेश गायकर, श्रेया ठाकूर, उमेश वैवडे, दिपक प्रसादे, राजेश सरफरे, सागर पाटील आदी मनसेचे पदाधिकारी, यूईएस कॉलेजचे शिक्षक हेमांगी म्हात्रे, .किमया ठाकूर, निकिता म्हात्रे व एनएसएस युनिटचे विद्यार्थी, मुख्याध्यापक प्रीतम टकले व शिक्षक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत पिरवाडी समुद्रकिनारी असलेले प्लास्टीकच्या पिशव्या, कचरा, दारूचे बाटल्या, मानवी कचराचे साफसफाई करण्यात आले. साफसफाई केल्याने पिरवाडी समुद्रकिनारा आता स्वच्छ व सुंदर दिसू लागला आहे.