| चिरनेर | दत्तात्रेय म्हात्रे |
उरण तालुक्यातील पिरवाडी – नागाव येथील सामाजिक कार्यकर्त्या कै.गुलाब ठाकुर (66) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या ठाकूर कुटूंबियामध्ये कधीही न भरून येणारी दरी निर्माण झाली आहे. स्वभावाने अत्यंत मायाळू आणि सर्वांच्या सुखदुःखात मोठ्या हिरिरीने सहभागी होणार्या गुलाब ठाकूर यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्ठा धक्का बसला आहे.
त्यांच्यावर पार्थिवावर पिरवाडी – नागाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुःखी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पिरवाडी – नागाव येथील निवासस्थानी नातेवाईक आप्तेष्ट आणि मित्रमंडळींनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी करू नये. असे आवाहन उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर व घारापुरीचे ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी केले आहे.