। म्हसळा । वार्ताहर ।
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असतात. यामध्ये आजचे युग हे विज्ञानाचे आहे आणि या विज्ञानातील काही गोष्टींची अभ्यास अधिक सुलभतेने व्हावे यासाठी विद्यालयांमध्ये अंजेनिया तारांगण केंद्रामार्फत तारांगण या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अंतराळातील काही घटना, लाव्हारस, चांद्रयान-3 हे यशस्वी उतरले कसे?, सूर्यमालेतील ग्रहांची माहिती इत्यादी माहिती दाखविण्यात आली.
यावेळी या तारांगण संस्थेचे प्रमुख सुरेश जाधव व अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला थ्रीडी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. यावेळी प्राचार्य डी.आर.पाटील यांनी विद्यार्थ्यांना तारांगण पाहण्यासाठी प्रोत्साहीत करून सहभागी होण्यास सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. यावेळी माध्यमिक विभाग पर्यवेक्षक जे.के. मांजरेकर, ई.सी. पाटील, जमदाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.