। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मुठवली खुर्द येथे संपन्न करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा तसेच तालुका कृषी अधिकारी वर्गाने महत्त्वपुर्ण उपस्थिती नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या वृक्षारोपण कार्यक्रमात गावातील मंदिर व शालेय परिसर तसेच गावाच्या अन्य मोकळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध जातींच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, कृषी विकास अधिकारी मिलिंद चौधरी, जि.कृषी अधिकारी राजेश घरत, गट विकास अधिकारी पाटील, लेखाधिकारी सतिश घोळवे, सहा.गट विकास अधिकारी फडतरे, विस्तार अधिकारी रणजित लवटे, अशोक दांडेकर, ग्रा.वि.अधिकारी वेटकोळी यांच्यासह पं.समिती अन्य अधिकारी वर्ग व सरपंच मयुरी तुपकर, उपसरपंच निलेश मालुसरे, योगेश शिंदे, कुमार कोल्हटकर, कविता शेळके, उस्मिता मानकर, घन: श्याम कराळे, संदेश तुपकर, हेमंत मालुसरे, गोपाळ खरिवले, मारूती तुपकर, महेश तुपकर, केशव खरिवले व ग्रामस्थ उपस्थित होते.