| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा एमआयडीसी येथील दीपक फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर फंडातून 2020-22 या दोन वर्षात तब्बल 12 हजार 420 वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन केले आहे. बुधवारी (दि.15 ) आणखी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पनवेल तालुक्यातील म्हाळुंगी हद्दीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी दीपक फर्टीलायझर कंपनीचे मुकुंद अग्रवाल, डी.पी. सिंग, राजेंद्र थोरात, कृष्णात बेलेकर, वामन कराळे, राजेश देशपांडे, विठ्ठल जाधव, विनेश निमकर, एस.एन. पंडित, अनुराधा सेकर, परिमंडळ वन अधिकारी जी.टी. अडकर, वनरक्षक पी.एस. इंडी, जे. एस. राक्षे, व्ही.एस. अळगी, आर.एस. यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रमात दिपक पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.
2019 मध्ये दीपक फर्टिलायझर तर्फे तळोजा जवळ 11 एकर जागेमध्ये 9 हजार 700 झाडे लावण्यात आली होती. कंपनीने 2020-21 मध्ये स्मार्ट केम टेक्नाँलॉजी तर्फे 1 हजार झाडे आणि 2021-22 ला 1 हजार झाडे लावली. 2021-22 मध्ये परफॉमन्स र्लिमिटेड तर्फे 5 हजार 600 झाडे, 2022-23 परफॉमन्स केमिसर्च लिमिटेड तर्फे 1 हजार 820 झाडे लावली. स्मार्ट केम के 7, 8 प्लॉट येथे 3 हजार झाडे लावली. अशी वन विभागाच्या अंदाजे 18 एकर जागेमध्ये 2 वर्षात एकूण 12 हजार 420 झाडे लावली. हे काम के.टी. पाटील कंपनीचे प्रोप्रायटर काशिनाथ यांच्यामार्फत होत असून, त्याचे संगोपन करण्याचे कामसुद्धा त्यांच्याकडे आहे.