लायन्स क्लब तर्फे वृक्षारोपण

। पनवेल । वार्ताहर ।
लायन्स क्लब पनवेल रत्नाच्या वतीने धोदाणी जवळील चिंचवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आंबा, कांचनार, करंज आदी शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पनवेल रत्नाचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य, गाव दत्तक योजनेचे अध्यक्ष विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,महेश किनरे, दिनेश करिपारा, हर्षदा चौधरी, सोमनाथ चौधरी, लायन्स क्लबचे अन्य वरिष्ठ अधिकारी गण, ज्योती देशमाने, सरोज शर्मा, प्रकाश चराटकर, संजय गोडसे, हरी अरोरा, निर्मला अरोरा, फ्रान्सिस जोसेफ, रुपेश मेहता, सिंधू रामचंद्रन, हरनीश कौर सेठी, राजी सैनी, साई पिल्लई, उमा पिल्लई, निर्मला अरोरा, चंद्रा बोरा, रिनाक्षी बॉथियाल, रोहन देशमुख आदी मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version