मुरुडच्या महात्मा फुले पतसंस्थेकडून वृक्षारोपण

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ही सामाजिक बांधिलकी जपणारी एका विश्‍वसनीय पतसंस्था आहे. पतसंस्थेच्या सर्व सदस्य व संचालक मंडळाने मुरुडमधील नागरिकांच्या सहकार्याने ‘झाडे घ्या व झाडे जगवा’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण केले.

एक झाड वाढविण्यात एक वेगळं समाधान असते. तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे . महात्मा फुले पतसंस्था आपणास एक मोफत रोपटे देत आहे, त्याला आपण लहान मुलासारखे वाढवून मोठे करा व या वसुंधरेचे रक्षण करुन खरे हिरो व्हा, असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष अजित गुरव यांनी केले. या वृक्ष जतन व संवर्धन मोहिमेला रविवारी दत्त देवस्थान मंदिरापासून सुरुवात झाली. दत्तवाडी येथील ‘दत्तवाडी मित्र परिवार’ यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या मित्र परिवाराने सकाळीच दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या दत्तवाडी मित्र परिवाराने दत्त मंदिर परिसरात अनेक झाडे लावून ती जगवली आहेत. स्वप्नील भगत, ऋतीक भायदे, अभिजित भायदे, दिपक दसम, मंगेश मोहिते, सिद्धेश देवगणे, ऋषिकेश मांदाडकर, अथर्व वाणी, दुर्गेश पाटील, साहिल वाळंज या दत्तवाडी मित्र परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version