मुरुडमध्ये वृक्षारोपण

| आगरदांडा | प्रतिनिधी |

सामाजिक बांधिलकीतून विविध प्रकारच्या लोकोपयोगी उपक्रमात पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळ नेहमीच अग्रेसर असते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी यंदा दरबार रोड मार्गावरील ग्रामीण रुग्णालय, तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अर्जुन, वड, सावर व पिंपळ आदी 50 झाडे लावण्यात आली.

यावेळी पद्मदुर्ग मंडळ अध्यक्ष अरविंद गायकर, दिव्या सतवीडकर, दामोदर खैरगावकार, दीपक जोशी, देवेंद्र सतवीडकर, उत्तम पाटील, शकील शहाबान, खेऊर, दिवेश बोरदे, नसीब शहाबान, नायब तहसिलदार शेखर खोत, डॉ. ऊषा चौले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अधिकारी रमेश गोरे, राधा पाटील, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस उप निरीक्षक अविनाश राठोड आदी उपस्थित होते .

Exit mobile version