ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण

। उरण । वार्ताहर ।

सारडे विकास मंचच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये सारडे विकास मंच, सदाबहार दोस्ती प्रतिष्ठान उरण, श्री नंदाई प्रतिष्ठान वशेणि, सुयश क्लासेस आवरे तसेच, अनेक निसर्गप्रेमींच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रमेश म्हात्रे, देवेंद्र पाटील, प्रसाद पाटील, हिराचंद पाटील, संतोष जोशी, हरिश्‍चंद्र म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, हरीश म्हात्रे खोपटे, निवास गावंड, संतोष मोकळ, संतोष खंडागळे, जयश्री खंडागळे, पुष्पा म्हात्रे, रुपाली म्हात्रे, स्नेहा पाटील, विनायक गावंड, शक्ती वर्तक, किशोर पाटील, रोहित पाटील, जितेंद्र पाटील, निखिल पाटील, मंगेश पाटील, मुकेश म्हात्रे, विकी पाटील, देवेंद्र पाटील, प्रज्योत ठाकूर आदिंच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम संपन्न झाला.

Exit mobile version