। उरण । वार्ताहर ।
चला निसर्ग करू हिरवगार लाऊ नव्या युगाच नव झाड, निसर्ग वाचवा निसर्ग वाढवा यासाठी सारडे विकास मंच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे उरण, साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली, सुयश क्लासेस आवरे यांच्या संकल्पनेतुन आणि निर्भय म्हात्रें यांच्या सौजन्याने कोमनादेवी ऑक्सिजनपार्कमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि त्याच संगोपन करत आहे.
या वर्षी नवीन संकल्पना करत निसर्ग प्रेमींना वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केल गेले आहे. निसर्गप्रेमीना यामध्ये वृक्षारोपण केल्यास त्यास संस्थेच्या मार्फ़त वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करत त्याला कापूर या जातीचे झाड भेट देऊन त्याला ते संगोपन करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. ती पूर्ण केल्या नंतर म्हणजे ते झाड लावण्यानंतरच त्यांना संस्थेचा निसर्ग मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
वृक्षप्रेमी नरदास कोठेकर गडप पेण, प्रा. प्रशांत म्हात्रे, सरिता म्हात्रे मॅडम आणि परिवार कडापे, प्रतीक्षा विकास गावंड आणि विकास भानुदास गावंड आवरे, गडप्रेमी निसर्गप्रेमी गणेश जी भोईर नवघर, सहा आसनी रिक्षा चालक मालक संघटना सदस्य शंकर पाटील (विराट) आवरे, दौलत भोईर आवरे आणि परिवार यांच्या मार्फत वृक्षमित्र संकल्पनेचा श्रीगणेशा झाला.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सदस्य सुयश क्लासेसचे निवास गावंड, मिलिद जी म्हात्रे यांनी स्वागत केलं. यामध्ये सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील, संदेश पाटील, त्रिजन पाटील, साई गावंड, मंगेश पाटील, श्रीवेद, सारा, दानिश, रुद्र विभा, स्नेहीत, मिथिल, रुंजल, आदी निसर्गप्रेमी तसेच अनेक बचे कंपनी हजर होते संस्थेच्या वतीने अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सर्वाचे आभार मानले.